April 23, 2026 7:56 pm

मनसेने पाठिंबा दिल्यास ठाकरे गटाचे 3 नगरसेवक वाढणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई महानगरपालिका निवडणुका होत नाही तोच, नामनिर्देशित (स्विकृत) नगरसेवकपदासाठी पक्षात लॉबिंग सुरू आहे. 227 निवडून आलेले तर 10 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 237 नगरसेवक सभागृहात उपस्थित असणार आहेत. नामनिर्देशित सदस्य मिळावे यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्टींसाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election Result 2026) सभागृहात पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहावर वाढवण्यात आली होती.

 

निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार भाजपला स्विकृत नगरसेवक 4 शिवसेना शिंदे गटाला 1, ठाकरेंना 2 मनसेने पाठिंबा दिल्यास 3 आणि अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास त्यांना 3 नामनिर्देशित नगरसेवक मिळतील. आता पालिका मुख्यालयातील सभागृहाची आसन व्यवथा 227 ची असून 10 नामनिर्देशित सदस्य वाढल्याने त्यांची आसन व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.

 

स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? 

स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.

 

नियुक्तीची प्रक्रिया आणि अधिकार

स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवरून आणि सभागृहाच्या संमतीने होते. महापौरांच्या शिफारशीनंतर अंतिम नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते. निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच स्वीकृत सदस्यांनाही मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. ते सभागृहातील चर्चेत सहभागी होऊ शकतात, विविध विषयांवर सूचना मांडू शकतात तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक यांसारख्या समित्यांमध्ये कार्य करू शकतात. मात्र, महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये (महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आदी) त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.

 

मुंबईत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली-

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!