April 23, 2026 9:14 pm

ओंकारचे ‘अगं अगं आई’ शब्द कानावर पडले तेव्हा कंठ दाटून आला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

विनोदी अभिनेता Onkar Bhojane याने ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘च्या गेल्या पर्वामध्ये पुनरागमन केले. तो काही वर्षे या मंचावर झळकला नव्हता, तरीही त्याच्या स्किटची चर्चा मात्र व्हायची. त्याच्या कमबॅकपासून ओंकारची याआधी गाजलेली जुनी स्किट पुन्हा एकदा पाहायला मिळणार,याकरता प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत. 5 जानेवारीपासून MHJ चे नवीन पर्व सुरू झाले आणि ओंकार यामध्ये नव्या प्रहसनांसह त्याची जुनी पात्र पुन्हा एकदा जगतो आहे. अलिकडेच त्याच्या ‘अगं अगं आई’ या स्किट सीरिजचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. तसेच यामध्ये ओंकारच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नम्रता संभेराव हिनेही खास पोस्ट शेअर केली आहे.

 

नम्रताने या स्किटमधील तिचे सहकलाकार असणाऱ्या ओंकार आणि प्रसाद खांडेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. अभिनेत्रीने असे कॅप्शन दिले की, ‘अगं अगं आईssss अरे माझ्या लेकरा ssss खरंच आमचे कान आसुसले होते हे ऐकायला. जेव्हा प्रहसन चालू होतं आणि ओंकारचे ‘अगं अगं आई’ हे शब्द कानावर पडले तेव्हा खरंच कंठ दाटून आला. डोळ्यात पाणी आलं. आमचं तुमचं सगळ्यांचं माझ्या ह्या लेकरावर नितांत प्रेम आहे आणि आपल्या सगळ्यांची हाक अखेर लेकराला ऐकू आली आणि लेकरू परत घराकडे परतलं.’

नम्रताने पुढे लिहिले की, ‘माझं लेकरू परत आलं. आता त्याला नेमका काय छंद जडलाय, कुठे उड्डाण घ्यायचीय… हे पाहायचं असेल तर महाराष्ट्राची हास्यजत्रा नक्की बघा सोमवार-मंगळवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. माझी अत्यंत लाडकी सीरिज.’ प्रसादनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर नम्रताची ही पोस्ट शेअर केली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!