April 24, 2026 1:13 am

वाघोली परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील वाघोली परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाला हटकले म्हणून त्याने ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला चढवला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाघोलीतील ‘सिल्व्हर क्रीस्ट’ सोसायटीमध्ये हे धक्कादायक कृत्य घडले. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारातून जात असताना, त्यांना आरोपी कृष्णा राजू गिरी (वय २१) आणि त्याची मैत्रीण आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. सोसायटीच्या सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणे चुकीचे असल्याचे सांगत ज्येष्ठाने त्यांना हटकले.

लोखंडी कड्याने डोक्यावर प्रहार

स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी आरोपी कृष्णा गिरी याने संताप व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. आरोपीने ज्येष्ठाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीच, पण संतापाच्या भरात हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर इजा झाल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासली जात आहे.

सोसायटीच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

आरोपीला जालना जिल्ह्यातून अटक

या घटनेनंतर परिसरात घबराटीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित ज्येष्ठाने दिलेल्या तक्रारीवरून वाघोली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. आरोपी कृष्णा गिरी (मूळ रा. जालना, सध्या रा. गाडे वस्ती, वाघोली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार करत असून, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या आणि ज्येष्ठांना लक्ष्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!