April 24, 2026 12:16 am

विधानसभेचा रेकॉर्डही मोडला ! शनिवार पेठेत भाजपचा सुनामी विजय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

विधानसभेलाही न जमलेलं महानगरपालिकेत जमलं ! बापू मानकरांचा इतिहास घडवणारा विजय

पुण्यात भाजपचा विक्रमी विजय; राघवेंद्र बापू मानकर यांचा 26,497 मतांचा ऐतिहासिक लीड

पुणे प्रतिनिधी :

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार राघवेंद्र बापू मानकर यांनी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई परिसर) मधून तब्बल 26,497 मतांचा विक्रमी लीड घेत दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे हा लीड विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही अधिक असून, महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वाधिक लीडपैकी एक मानला जात आहे.

गेल्या 10–15 वर्षांपासून गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत बापू मानकरांनी परिसरात मजबूत जनाधार निर्माण केला. त्यांचे २४ तास सुरू असलेले जनसेवा कार्यालय हे नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र ठरले असून, “प्रॉब्लेम असला तरी बापू येणारच” हा विश्वास मतदारांमध्ये दृढ झाला आहे.

उमेदवारी जाहीर होताच मित्रमंडळी आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा निवडणूक प्रचारातील निर्णायक घटक ठरला. निवडणूक अर्जात नमूद केलेली त्यांची एकमेव मालमत्ता — रुग्णवाहिका (अॅम्बुलन्स) — हा मुद्दा संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय ठरला.

भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांना गृहीत न धरता, पारंपरिक प्रचार पद्धती, कामावर आधारित एकमेव मुद्दा आणि यंत्रणेत सातत्य ठेवत त्यांनी प्रचार केला. याच शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख रणनीतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.

विजयानंतर समर्थकांनी गुलाल उडवत जल्लोष केला असून, हा विजय सातत्यपूर्ण जनसेवा, सामाजिक संपर्क आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा कौल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!