पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील 6 मुख्य राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांपैकी 4 शहराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आपली प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी प्रस्थापित राजकीय गणितांना सुरुंग लावला आहे. शहराच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या 6 प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी यावेळेस निवडणूक लढवली होती. मात्र, यापैकी केवळ दोनच शहराध्यक्ष आपली जागा वाचवू शकले, तर इतर 4 जणांना मतदारांनी घरी बसवले आहे.
विजयी झालेले शहराध्यक्ष
धीरज घाटे (भाजप) – भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या प्रभागातून विजय मिळवत भाजपचा गड कायम राखला आहे.
अरविंद शिंदे (काँग्रेस) – काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही चुरशीच्या लढतीत विजय संपादन केला असून, काँग्रेसच्या घटत्या प्रभावातही त्यांनी आपली जागा टिकवून धरली आहे.
साईनाथ बाबर (मनसे)- मनसेचे आक्रमक शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनाही मतदारांनी नाकारले आहे, ज्यामुळे मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाना भानगिरे (शिवसेना – एकनाथ शिंदे गट) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.











