राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता१५) रोजी मतदान पार पडलं, त्याचा निकाल आज (१६ जानेवारी रोजी) जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या दोघींचा निकाल आता समोर आला आहे. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती, मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.या प्रभागात एक जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली आहे, तर बाकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत.
रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव
सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाली आहे. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. सोनाली आंदेकरने तुरुंगातुन निवडणूक लढवली होती. हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील आरोपी आहेत.
सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघीनी तुरुंगातुन निवडणूक लढवली आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. आता यांच्या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल की आणखीच वाढेल असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत, आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन, या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती.
बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे देखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत.











