April 24, 2026 1:14 am

EVM मशीन बदलल्याचा आरोप, रुपाली पाटील आक्रमक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महापालिकेतील निवडणुकांमध्ये रंगतदार लढाया पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मशीन बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावरील मतमोजणी थांबवली.

 

रुपाली पाटील आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. मशीन बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. जवळपास १ तासांहून जास्त काळ मतमोजणी बंद होती.

 

पुण्यातील प्रभाग क्रमांक २६ सह दोन जागांवर रुपाली पाटील ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना एबी फॉर्म मिळाला होता.

रुपाली पाटील पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांनी नगरसेवकपद भूषवले आहे. मनसेला रामराम ठोकून २०२१ मध्ये रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली होती.

रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधील अंतर्गत वाद काही दिवसांपासून उफाळून आलेला दिसला. पक्षातील अंतर्गत वादामुळे अस्वस्थ असलेल्या रुपाली पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकणं निश्चित मानलं जात असतानाच रुपाली पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने त्या ‘घड्याळ’ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!