April 24, 2026 1:12 am

त्या महिलेऐवजी दुसराच मतदान करुन गेला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे: पुण्यात काही ठिकाणी मतदानानंतर बोटावरती शाई पुसून बोगस मतदान होत असल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जात आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही महिला बोगस मतदान करत असल्याचा चाकणकरांचा दावा आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये अनेक महिला व मुले बोगस मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहे, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रूपाली चाकणकरांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 21 मध्ये एका महिलेच्या नावाखाली ऑलरेडी मतदान झालं असल्याची माहिती समोर आली आहे, आणि नंतर महिलेकडून प्रेशर केल्यानंतर पोस्टल मतदान करून घेण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील ही घटना आहे.

प्रभाग क्रमांक 21 मधील मतदार मतदानासाठी कटारिया हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यावेळी एक महिला मतदान करण्यासाठी आत गेल्या होत्या, त्यांनी पाहिलं की त्यांच्या नावावर आधीच मतदान झालेलं आहे. ते मतदान झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, आमच्या नावावरती बोगस मतदान इथे कोणीतरी करून गेलेला आहे, हुबेहूब सही आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत, त्यानंतर त्यांना परत मतदान करायला लावलं, त्याचबरोबर मृत असलेल्या व्यक्तींची देखील यादी उपलब्ध नाही. मृत व्यक्तींच्या नावावर देखील मतदान होत असेल अशी शंका देखील काहींनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांना कशाप्रकारे मदत केली जाते हे पाहावं अशी मागणी उपस्थित त्यांनी केली आहे.

 

बोगस मतदान झालेल्या महिलेने सांगितलं की, मी जेव्हा माझा आयडी सांगितला तेव्हा तिथे त्यांनी नाव शोधायला चालू केली, त्यांनी नाव बघून सांगितलं की तुमचं मतदान झालेलं आहे, त्यानंतर त्यांनी फाईल चेक केली, त्यामध्ये देखील माझी सही करण्यात आलेली होती, त्यांनी उलट मलाच म्हटलं की तुम्ही मतदान करून गेलेला आहात, त्यानंतर त्यांनी कागद वगैरे दिला त्याच्यावर सही करायला सांगितली पण मी काय केली नाही, पण नंतर त्यांनी मला सांगितलं की याच्यावर सही करा आणि सांगा त्यानंतर त्यात तुमचा बोगस मतदान झालेला असेल तर ते कट होईल. मी जाण्याआधीच माझ्या नावावर कुणीतरी मतदान करून गेले होते.

महानगरपालिकांमध्ये 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?

बृहन्मुंबई महानगरपालिका : १७.५८ %पुणे – १२.५० टक्केनवी मुंबई- 15 टक्के कोल्हापूर : 22.45 टक्के इचलकरंजी – 18.57 टक्केपिंपरी चिंचवड – 16.03 टक्के संभाजीनगर – 16 ते 17 टक्के नाशिक – 14.31 टक्के सांगली मिरज कुपवाड महापालिका – 17.20 टक्केसोलापूर : 18.08 टक्केअहिल्यानगर : 20.16 टक्के जळगाव शहर : 13.39 टक्केधुळे : 14.23 टक्के नागपूर : 12%पनवेल : 17%मालेगाव – 20.92 टक्केजालना – 20.13 टक्केअमरावती – 17.02 टक्के.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!