April 23, 2026 10:28 pm

मतदानच्या 1 दिवस आधीच पुण्यात खळबळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- राज्यातील 29 महानगरपालिकांच्या मतदानासाठी 24 तासांहूनही कमी वेळ शिल्लक असतानाच पुण्यात एका व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आज सकाळी एक व्हिडीओ पोस्ट करत भारतीय जनता पार्टीवरच निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर या निवडणुकीमध्ये प्रभाग 23 मधून निवडणूक लढवत आहेत. धंगेकर हे कसबा पेठचे माजी आमदार आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. त्यांनी आता महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीवरच टीका केली आहे.

 

धंगेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवाराच्या पत्नीवर गंभीर आरोप करत तो बारमध्ये बारबालांसोबत नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करतना धंगेकरांनी भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळं आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे,” असा टोला धंगेकरांनी आपल्या पोस्टच्या पहिल्याच ओळीत लगावला आहे. “खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो. या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबालांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे,” अशी टीका धंगेकरांनी केली आहे.

एवढ्यावरच न थांबता धंगेकरांनी भाजपामधील पुण्यातील मुख्य नेत्यांचा उल्लेख करत त्यांना थेट सवाल केला आहे. “संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात,” असा टोला धंगेकरांनी पोस्टच्या शेवटी लगावला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील विस्तव धगधगत असून याचा परिणाम निकालावर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!