April 23, 2026 10:35 pm

विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारांना व्यासपीठ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ पुणे व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे पुणे जिल्हास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ हे तीन दिवसांच्या कालावधीत मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, डिजिटल सुरक्षा आदी विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करून आपली संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.

 

या प्रदर्शनाचा समारोप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्प, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व संशोधन वृत्तीला चालना देणारे हे प्रदर्शन जिल्ह्यातील शाळांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

 

समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी.आर.डी.ओ चे सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सराफ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाडे, जिल्हा परिषद पुणेचे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज धाराशिवकर, मॉडेल स्कूल जिल्हा परिषद पुणेच्या जिल्हा समन्वयक डॉ. पूनम कदम, प्रकल्प कन्सल्टंट श्रेया नवली, जीएचआरसीएसीएसचे संचालक डॉ. एन. आर. कुलकर्णी, रायसोनी कॉलेजचे उपसंचालक डॉ. प्रवीण जांगडे, मार्केटिंग विभाग प्रमुख अमिता सिंग व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका दिवेना शार्दुल उपस्थित होते.

 

मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विज्ञान शिक्षणातून नवोन्मेष, समस्या सोडविण्याची क्षमता व राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणारी पिढी घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

रायसोनी एज्युकेशनचे चेअरमन श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी व संचालिका पलक रायसोनी यांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, मार्गदर्शक, परीक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

 

या जिल्हास्तरीय प्रदर्शनातून पुढील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

 

प्राथमिक विद्यार्थी गट

देवयानी विठ्ठल बडे – क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके विद्यालय, रावडे/भोर

प्रकल्प : Automatic Water Cannon

 

देवांश गणेश यादव – बाबनराव खांडोई सेकंडरी स्कूल, पुणे

प्रकल्प : Duster Cleaner

 

स्वराली नवनाथ दाभाडे – श्री दत्ता सेक. अ‍ॅण्ड हायस्कूल, पिंपरखेड, शिरूर

प्रकल्प : Technology Use in Medical Field

 

आदिवासी प्रवर्ग

रोहन वसंत कोकणे – न्यू इंग्लिश स्कूल, करंजाळे (जुन्नर)

प्रकल्प : Protection Bed

 

दिव्यांग प्रवर्ग

ग्रीसी नितीन थोरात – समजभूषण संभाजीराव भुजबळ स्कूल, शिरूर

प्रकल्प : Smart Agriculture

 

माध्यमिक विद्यार्थी गट

अयप्पा वेंक्यप्पा भंडिगेर – डॉ. कलमाडी शामराव स्कूल, पुणे

प्रकल्प : Smart Patient Bed with Generator

 

श्री शंतनू सुतार – वर्धमान विद्यालय, वालचंदनगर, इंदापूर

प्रकल्प : Smart Traffic Signal

 

शिवराज शिव गायकवाड – कै. तुकाराम धोढिबा पाठारे विद्यालय, खराडी

प्रकल्प : Smart Traffic Signal

 

आदिवासी (माध्यमिक)

बलकृष्ण वारे – भीमाशंकर विद्यालय, आंबेगाव

प्रकल्प : Paper made from Grass

 

दिव्यांग (माध्यमिक)

धनराज महादेव वीर – BJS स्कूल, पिंपरी

प्रकल्प : Fire Alarm System

 

शिक्षक गटामध्ये वर्षा रमेश सालुंखे, शारदाबाई पवार विद्यालय, बारामती, विजय मातृ वरपे, संभाजी राव विद्यालय, जटेगाव बुद्रुक व भरत सोमनाथ घोरपडे, एन. एम. नांदकार अनुदानित शाळा, आंबेगाव यांचे प्रोजेक्ट राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडण्यात आले आहे.

 

प्रदर्शनातील प्रकल्पांचे मूल्यमापन पुढील मान्यवरांनी केले. डॉ. पगारिया मधुरी चंद्रकांत, डॉ. शिवाजी विठ्ठल भोसले, श्री. सुनील सुग्रीव साकंडे, डॉ. सोनवणे शिवाजी, श्री. जयदीप रमेश नरवाडे व श्री. प्रविण सुरेश नागवाडे.

बाल वैज्ञानिक प्रकल्पांचे निकाल

 

माध्यमिक गट (सर्वसाधारण)

प्रथम – प्रांजल परमेश्वर इंगळे (शेठ आर. आर. अग्रवाल माध्यमिक विद्यालय, भोसरी) – अंतराळातील आश्चर्य

द्वितीय – ईश्वरी कैलास शिंगणे (जिजामाता हायस्कूल, जेऊरी) – वीज नसलेला एक दिवस

तृतीय – देवांगी गणेश यादव (स्व. बबनराव खेडूजी कामठे माध्यमिक विद्यालय, खेवलवाडी) – वीज नसलेला एक दिवस

 

माध्यमिक गट (दिव्यांग)

प्रथम – मुगल अंता पोकळेकर (स्व. एस. बी. सी. स्कूल) – वीज नसलेला एक दिवस

 

उच्च माध्यमिक गट (सर्वसाधारण)

प्रथम – वैष्णवी देशमुख (ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल) – मानवी मेंदू निरोगीचे अद्भुत आश्चर्य

द्वितीय – संस्कृती सुनील कांबळे (शेठ आर. आर. अग्रवाल माध्यमिक विद्यालय, भोसरी) – मानवी मेंदू निरोगीचे अद्भुत आश्चर्य

तृतीय – मानसी ज्ञानेश्वर सागर (पुरोगामी माध्यमिक विद्यालय) – डिजिटल युगातील सायबर सुरक्षा

 

उच्च माध्यमिक गट (दिव्यांग)

प्रथम – प्रेम विष्णू जाधव (श्री. एच. बी. गिर्मे माध्यमिक विद्यालय, वानवडी) – डिजिटल युगातील सायबर सुरक्षा

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!