April 23, 2026 4:45 pm

पुण्यात प्रभाग 23 मध्ये मनसेच्या उमेदवाराची मुसंडी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्याने सध्या शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद अंतिम टप्प्यात झोकली आहे. पुण्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुण्यात तळ ठोकला आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर शेलक्या भाषेत टीका केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अशातच शहरात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि काँग्रेस यांच्यातील युतीची चर्चा असली तरी, प्रभाग क्रमांक 23 मध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. या प्रभागात शिवसेना (UBT) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे.

 

या चौरंगी लढतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रल्हाद गवळी यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रविवार पेठ, गणेश पेठ आणि भवानी पेठ या दाट लोकवस्तीच्या भागात गवळी यांनी गेल्या काही काळात केलेल्या कामांमुळे त्यांना स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

 

नुकतीच भवानी माता मंदिर परिसरातून काढण्यात आलेल्या महिला पदयात्रेला परिसरातील महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या पदयात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि ठिकठिकाणी रांगोळ्या काढून महिलांनी आपला सहभाग नोंदवला. स्थानिक पातळीवरील सामाजिक संपर्क आणि महिलांच्या प्रश्नांवर असलेली पकड यामुळे प्रल्हाद गवळी यांची चर्चा सध्या संपूर्ण प्रभागात ‘लाडका भाऊ’ म्हणून होताना दिसत आहे.

 

प्रभागातील महिला मतदारांशी संवाद साधला असता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था, गल्लीतील प्रकाशव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा या मूलभूत सोयीसुविधांबाबत प्रल्हाद गवळी यांनी तत्परतेने काम केल्याचे सांगण्यात येते. सण-उत्सव असो वा वैयक्तिक अडचणी, स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहमीच हजेरी लावल्यामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. घरगुती उद्योगांना प्रोत्साहन आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांवरही महिलांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.

 

प्रभाग २३ मधील ही महिलांची ‘सुप्त लाट’ आणि त्यांचा वाढता सहभाग पाहता, आगामी मतदानात हा वर्ग कोणाच्या बाजूने उभा राहतो, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. सध्यातरी या प्रभागात मनसेच्या उमेदवाराची चर्चा विरोधकांची चिंता वाढवणारी ठरत आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!