दक्षिणात्य चित्रपट हे कायम प्रेक्षकांना वेड लावणारी असतात हे अनेकदा समोर आलंय. कधी जबरदस्त ॲक्शन तर कधी रोमँटिक, हॉरर अशा सगळ्याच प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. केवळ चित्रपटांच्या बाबतीतच नाही तर दक्षिणात्य कलाकारांना चाहत्यांचं मिळणारं प्रेम हे कायम चर्चेचा विषय ठरतं. मग ते अभिनेते रजनीकांत असो किंवा प्रभास. सध्या दक्षणात्य सुपरस्टार प्रभासच्या बहुचर्चित चित्रपटाची एकच हवा आहे. ‘द राजा साब ‘ हा चित्रपट 9 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि ओपनिंग डे लाच या चित्रपटाने 53 कोटींचा गल्ला केला. प्रभासच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ तयार झाली आहे. याचा नुकताच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. राजा साब चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान चाहत्यांच्या जल्लोषाचा एक आगळा वेगळा प्रकार समोर आलाय. ‘प्रभास की जय ‘, ” राजा साब, राजा साब” अशा घोषणा करत चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये थेट मगरी फिरवल्या आहेत.
नेमकं घडलं काय?
राजा साब या चित्रपटात प्रभासच्या भूमिकेच्या प्रेमात चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. चित्रपट पाहून चाहत्यांचं प्रेम एवढं उफाळून आलं की प्रभासच्या अनेक चाहत्यांनी थेट चित्रपटगृहामध्ये मगरी फिरवल्या. चित्रपट सुरू असताना अचानक प्रभासच्या चाहत्यांचा एक मोठा घोळका डोक्यावर मगरी घेऊन आत आला. सगळ्यांनी एकत्रितपणे ‘राजा साब, राजा साब’ अशा घोषणा देत थिएटर दणाणून सोडलं. अचानक मगरी दिसल्यामुळे आजूबाजूचे प्रेक्षकही कावरेबावरे झाले होते. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या चित्रपटगृहातील आहे याची माहिती समोर आलेली नसली तरी प्रभासचा चित्रपट बघताना एखाद्या चित्रपटगृहात चहा त्यांचा अनुभव कसा असावा हे लगेच लक्षात येते. चित्रपटगृहातील हा अजब जल्लोषाचा व्हिडिओ वाऱ्याचा वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी आणलेल्या मगरी ह्या खोट्या असल्या तरी भारावलेल्या चाहत्यांना आपला आनंद व्यक्त करण्यासाठी थेट त्या चित्रपटगृहात आणाव्याशा वाटल्या याची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांनी मगरी आणल्या कशामुळे ?
चाहत्यांनी थिएटरमध्ये मगर का आणली? याचं कारणही आता समोर आलं आहे .खरंतर दरवाजा साब या चित्रपटातील एकादृश्यात प्रभास चक्क एका मगरी सोबत लढाई करतो. हा सीन प्रेक्षकांना इतका आवडलाय की प्रभासची ही लढाई चाहत्यांनी चित्रपटगृहातच साजरी करायचं ठरवलं.
प्रभासचा द राजा साब हा चित्रपट 9 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास सोबत मालविका मोहन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले आहे.











