April 23, 2026 10:42 pm

एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनांचा दरवाजा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तुंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरील एका वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून तीन लाख रुपयांचे कपडे चोरून नेण्यात आल्याची घटना सोमवारी (५ जानेवारी) घडली होती.

या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाईप, दोन दुचाकी, चोरलेला एक लॅपटॉप, कपडे असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एम. जी. रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदीप उकीरडे यांनी ही कामगिरी केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!