April 23, 2026 9:21 pm

पुण्यात विविध भागात चोरट्यांचा धुमाकूळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : शहरात दुकानांचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी कात्रजमधील किराणा माल दुकानाचे कुलूप तोडून रोकड, तसेच दागिने असा ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी दीप बंगला चौकातील तीन दुकाने फोडून रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती.

याबाबत एका व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे कोंढव्यातील शांतीनगर परिसरात राहायला आहेत. त्यांचे कात्रज भागातील सुखसागरनगर भागात किराणा माल दुकान आहे. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड, तसेच दुकानातील देव्हाऱ्यात ठेवलेले सोने-चांदीच्या वस्तू असा ऐवज लांबविला. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. औषध विक्री, किराणा माल, तसेच मद्य विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!