September 6, 2026 2:52 pm

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची १९ ऑगस्टला वार्षिक सर्वसाधारण सभा; सभासदांना केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : जुन्नर-आंबेगाव येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निवृत्तीनगर-धालेवाडी येथील कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२६ मधील संस्थेच्या कामकाजाचा संचालक मंडळाचा अहवाल नोंदविणे तसेच आर्थिक वर्षअखेरच्या जमा-खर्चपत्रकाची नोंद घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

सभेत वैधानिक लेखापरीक्षकांकडून सन २०२५-२६ चा लेखापरीक्षण अहवाल सादर करून त्याची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच सन २०२६-२७ साठी संचालक मंडळाने सादर केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकास मंजुरी, अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती आणि आर्थिक वर्षासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती याबाबतही विचार करण्यात येणार आहे.

याशिवाय अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे तसेच मागील वर्षातील लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवालास मंजुरी देण्यासंदर्भातही सभेत चर्चा होणार आहे.

सभासदांनी स्मार्ट शेतकरी कार्ड व आधारकार्ड आणावे

वार्षिक सभेस उपस्थित राहताना सर्व सभासदांनी स्मार्ट शेतकरी कार्ड सोबत आणावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

ज्या सभासदांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी सभेला येताना आधारकार्ड सोबत आणावे आणि सभेच्या वेळीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.

सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि सभेच्या कामकाजात सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!