September 6, 2026 2:20 pm

दारुड्या मुलाने केला आईचा खून; भोर तालुक्यातील महुडे-माळवाडी येथील घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोर | प्रतिनिधी

भोर तालुक्यातील महुडे येथील माळवाडी परिसरात दारूच्या व्यसनातून मुलाने स्वतःच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) घडली. समीर काळू मालुसरे (वय ३१) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी मुलाचे नाव असून, बेबी काळू मालुसरे (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दारू पिण्यावरून त्याचा आईसोबत वाद झाला. घराचे बांधकाम सुरू असल्याने दारू पिऊ नकोस, असे आई बेबी मालुसरे यांनी मुलाला सांगितले होते. मात्र, समीर हा दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी करत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बेबी मालुसरे या घरात झोपण्यासाठी आडव्या झाल्या असताना समीर याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेत बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपीने आईचा मृतदेह घरातच ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून तेथून निघून गेला. शेजाऱ्यांनी आईबाबत विचारणा केली असता, आई गावाला गेल्याचे त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. ८) सकाळी सुमारे सात वाजता दारूची नशा उतरल्यानंतर समीर घरी परतला. त्यावेळी त्याने आपल्या चुलत भावाला आदल्या दिवशी आईसोबत झालेल्या वादानंतर आपण तिला मारल्याचे सांगितले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस पाटलांना देण्यात आली.

माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश माने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपी समीर मालुसरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर बाबींचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दारूच्या व्यसनातून झालेल्या कौटुंबिक वादाचा शेवट आईच्या मृत्यूत झाल्याने महुडे-माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!