June 5, 2026 7:36 am

चाकूचा धाक दाखवून टेंभुर्णीजवळ दरोडेखोरांनी साडी व्यापाऱ्याच्या सेल्समनला लुटले अन्

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील मोठे साडी व्यापारी बाहुबली मुत्तीन यांचा सेल्समन धुंडाप्पा खलाटे हा गुजरातच्या सुरत शहरातून साड्यांचा माल खरेदी करण्यासाठी जात होता.

व्यापाऱ्याने साड्या खरेदी करण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची रोकड दोन पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून आयशर टेम्पोच्या केबिनवर ताडपत्रीखाली लपवून ठेवली होती. मात्र, 11 मे रोजी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ या टेम्पोला एका कारने अडवले आणि शस्त्रांचा धाक दाखवून रक्कम लुटली.

हा केवळ दरोडा नसून, यामागे अत्यंत पद्धतशीर रेकी आणि अंतर्गत माहिती फुटल्याचा संशय आहे. प्रवासादरम्यान मोडनिंब येथे मालकांच्या सांगण्यावरून गाडी बदलण्यात आली आणि पैशांची पोती केबिनच्या टपावर हलवण्यात आली. हा बदल केवळ जवळच्या लोकांनाच माहीत असण्याची शक्यता आहे. नंबर प्लेट नसलेल्या राखाडी रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांनी टेम्पोला ओव्हरटेक करून थांबवले. त्यांनी सेल्समनचा गळा दाबून, चाकूचा धाक दाखवत चालकाला मारहाण केली आणि थेट केबिनच्या टपावर चढून ताडपत्री फाडत पैशांची पोती पळवून नेली.

तांत्रिक तपासात संशयित सिद्धेश्वर नामदेव माने याचा ही हात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोडनिंब येथील टेम्पो मालक अजित सुर्वे आणि सिद्धेश्वर माने या दोन संशयितांना अटक केली आहे, मात्र 3 कोटींची मुख्य रक्कम अद्याप हस्तगत झालेली नाही. दोन्ही संशयितांना माढा न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास प्रभारी अधिकारी राहुल आत्राम करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!